(संगमेश्वर)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना संगमेश्वर येथे त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला, त्यामुळे एकच धांदल उडाली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. अजित पवार यांना सुरक्षित गाडीत बसवल्यामुळे अजित पवार मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावले. संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हा हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ताफ्यातील अनेकांची पळापळ झाली. काहींनी तोंड झाकण्यासाठी गमछा, उपरण्याचा वापर केला, तर काहींनी मधमाशा झटकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मधमाशांच्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात मधमाशांचा घोंगाट आणि गोंधळाचे दृश्य पाहायला मिळत आहे. शनिवारी परभणी जिल्हा दौऱ्यातही शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकून हल्ला केला होता.