(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे विल्ये येथे बौद्धजन विकास कमिटी, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम समाजरत्न पुरस्कार प्राप्त आयु. जयराम धाकू कांबळे यांच्या निवासस्थानी पार पडला. अध्यक्षस्थानी आयु. राहुल गंगाराम कांबळे होते. प्रारंभी ध्वजारोहण आयु. राजकुमार तुकाराम कांबळे व आयु. रजिता राहुल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्ष आयु. राहुल कांबळे व महिला अध्यक्षा मेधा सुवेज कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आयु. सुवेज सिताराम कांबळे यांनी केली. बुद्ध वंदना उपासक श्रामणेर अरविंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यामध्ये विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. जयंतीनिमित्त झालेल्या भाषणांमध्ये अनेक लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक वक्त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर मनोगते व्यक्त केली. यामध्ये अथर्व कांबळे,आराध्या कांबळे, विराज विजय कांबळे,नीती कांबळे, कबीर कांबळे, निल भालचंद्र कांबळे, आस्था सुवेज कांबळे, रिया संतोष कांबळे, सारिका राजकुमार कांबळे, प्रीतम सिद्धार्थ कांबळे, विधी वैभव कांबळे,सुरेखा भालचंद्र कांबळे,सपना समीर कांबळे, सपना भिकाजी कांबळे,अनिता जयवंत कांबळे,अशोक कांबळे, रजिता कांबळे,अक्षता नरेश कांबळे, प्राची कांबळे, चंद्रकांत कांबळे,सुवेज कांबळे,अरविंद कांबळे,विजय कांबळे,नरेश कांबळे, तुषार सिद्धार्थ कांबळे, सुकेशनी अशोक कांबळे, जनार्दन कांबळे, मीना विजय कांबळे, जयराम कांबळे यांनी सहभाग घेऊन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते आयु. चंद्रकांत भागा कांबळे (मुंबई) व आयु. राकेश मोहन कांबळे (विद्रोही कवी) यांनी लाऊडस्पीकर सेटसाठी पन्नास हजार रुपयांचे धम्मदान दिले. तसेच आयु. नरेश कांबळे यांनी स्वतःच्या कौशल्याने डाएस तयार केला. ज्येष्ठ कार्यकर्ते आयु. जयराम कांबळे यांनीही एक हजार रुपयांचे धम्मदान करून समाजकार्याला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात आयु. राहुल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रभावीपणे आयु. नरेश तुकाराम कांबळे यांनी पार पाडले.