(रत्नागिरी / वार्ताहर)
क्रेडाई रत्नागिरी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आज बुधवार दि. १६/०४/२०२५ रोजी हॉटेल विवा, रत्नागिरी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल तावरे उपस्थित होते. सोबत क्रेडाई महाराष्ट्राचे खजिनदार श्री. सुरेंद्र भोईते, टाऊन प्लानिंग नगररचनाकार श्री. ज्ञानु माने, मुख्याधिकारी नगरपरिषद श्री. तुषार बाबर, श्रीम. स्मिता कलकुटी, क्रेडाई चिपळूण अध्यक्ष श्री. शकील चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०२५-२७ या वर्षांकरिता श्री. महेश गुंदेचा यांनी अध्यक्ष पदी, श्री. प्रदीप कट्टे यांनी सचिव पदी, आणि श्री. महावीर जैन यांनी खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली. प्रारंभी मावळते अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते यांनी सर्वांचे स्वागत करून नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. महेश गुंदेचा यांच्याकडे पदभार सोपवला, सोबतच भुते यांनी मागील दोन वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला. याप्रसंगी प्रमुख अथिती श्री. तावरे यांनी शुभेच्छापर भाषण केले व क्रेडाई रत्नागिरीसाठी कायम मदतीचा हात पुढे असेल असे आश्वासन तावरे यांनी यावेळी केले. नवीन टाऊन प्लानिंग नगररचनाकार श्री. ज्ञानु माने यांनी शुभेच्छापर भाषण देऊन नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच, क्रेडाई रत्नागिरी माजी अध्यक्ष श्री. दिपक साळवी यांची क्रेडाई महाराष्ट्र सह संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रेडाई बोर्ड मेंबर श्री. राजेश शेट्ये यांची सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोकण प्रदेश उपप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात क्रेडाई संस्थेमध्ये नोंदणी झालेल्या सभासदांचे स्वागत संस्थेतर्फे करण्यात आले. क्रेडाई रत्नागिरी २०२५-२७ साठी युध विंग संयोजक पदी श्री. राहुल भोसले आणि सह- संयोजक पदी श्री. वरुण वालावलकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री. रुपेश साळवी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता नूतन उपाध्यक्ष श्री. प्रवीण जैन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दिनेश जैन, आनंद चौगुले, मिथुन मणियार, प्रवीण लाड व संस्था सभासद यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.