( पाली / वार्ताहर )
मूत्रपिंड निकामी झाल्यावर रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रवपदार्थ काढून टाकण्यासाठी केली जाते. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा ते रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकत नाहीत या स्थितीत रुग्णाच्या शरीरातील रक्तातील विषारी पदार्थ वाढू लागतात, ज्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. याला अनेकदा बदलती जीवनशैली आणि हानीकारक व्यसने ही कारणीभूत असून त्यांना जर आळा घातला तर निश्चितच रुग्ण आपल्या किडनीला निरोगी ठेवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी केले.
ग्रामीण रुग्णालय पाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व एच.एल.एल लाईफ केअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाडायलिसिस सेंटर चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला जेष्ठ उद्योजक रवींद्र सामंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.विकास कुमरे, मूत्रपिंडविकार डॉ.अमेय बेडेकर, डॉ.विनोद कानगुले, पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे, माजी सरपंच रामभाऊ गराटे, शिवसेना पाली जि.प. गटाचे विभागप्रमुख सचिन सावंत, संदीप गराटे, प्रकाश परपते, गुरुनाथ गराकटे, सदानंद पोवार, एच.एल.एल जिल्हा समन्वयक दुर्वेश खाके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकिय अधीक्षक डॉ.विकास कुमरे यांनी सांगितले की, जेव्हा मूत्रपिंड पूर्णपणे कार्य करत नाहीत किंवा मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू कमी होत असेल तर डायलिसिसची गरज भासू शकते. जेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थांची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचते, तेव्हा डायलिसिस आवश्यक होते. शरीरातील द्रवपदार्थाची वाढ:जेव्हा मूत्रपिंड अतिरिक्त द्रव बाहेर काढू शकत नाहीत, तेव्हा डायलिसिस द्रव काढण्यासाठी मदत करते.
डायलिसिसचे दोन प्रकारचे असून हेमोडायलिसिस मध्ये रक्त बाहेर काढून फिल्टर केले जाते आणि मग ते शरीरात परत पाठवले जाते.पेरिटोनियल डायलिसिस मध्ये यात पोटात एक द्रव भरला जातो, जो रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव शोषून घेतो.
यावेळी उद्योजक रविंद्र सामंत यांनी डायलिसिस विभागाला शुभेच्छा दिल्या व चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करण्यासंदर्भात सूचना दिल्या. डायलिसिस विभागाचे तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरीक व डायलिसिसचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक,त्याबरोबर ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग या महाडायलिसिस च्या लोकार्पण सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.