(रत्नागिरी)
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 “या अभियानात नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज या प्रशालेला तालुकास्तरीय गुणांकनामध्ये रत्नागिरी तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी येथील कै. शामराव पेजे सभागृहामध्ये याचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
शाळेमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य, क्रीडा, स्वच्छता, पर्यावरण यांच्यासंबंधीचे उपक्रम तसेच व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम, शैक्षणिक ध्येय धोरणांची अंमलबजावणी इत्यादी निकषांच्या आधारे हे गुणदान केले गेले.
संस्था अध्यक्ष श्री. प्रशांतजी कदम, उपाध्यक्ष श्री. राजेश कोळवणकर, सचिव श्री. सुधीर कांबळे, खजिनदार रविंद्र संसारे तसेच सर्व संचालक, संस्थेचे सी. ई. ओ. श्री. रविन्द्र दरडी यांनी मुख्याध्यापक सौ. रुपाली संतोष सावंत देसाई व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल पंचक्रोशीतुनही शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.