सोनं आणि रोख रक्कम घरात ठेवण्याची मर्यादा किती? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारतात सोन्याची खरेदी आणि साठवणूक ही परंपरा आणि गुंतवणुकीचा एक भाग आहे, पण यासंदर्भात आयकर विभागाचे काही कठोर नियम आहेत. जर तुम्ही या मर्यादांचे पालन केले नाहीत तर आयकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता आहे.
सोनं ठेवण्याची मर्यादा:
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) च्या ताज्या नियमांनुसार, सोनं ठेवण्याची मर्यादा व्यक्तीच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून आहे:
विवाहित महिला: 500 ग्रॅम सोन्याची मर्यादा. यापेक्षा जास्त सोनं असेल, तर त्याचा वैध स्रोत दाखवावा लागेल.
अविवाहित महिला: 250 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येईल.
रोख रक्कम:
आयकर कायद्यानुसार, घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतीही ठोस मर्यादा नाही. मात्र, जर आयकर विभागाने छापा टाकला आणि तुमच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली तर तुम्हाला त्या रकमेचा स्रोत स्पष्ट करावा लागेल. जर तुम्ही रोख रकमेचा वैध स्रोत (उदा. व्यवसाय उत्पन्न, पगार, कायदेशीर विक्री) दाखवू शकला नाहीत, तर ती रक्कम जप्त होऊ शकते. अशा परिस्थितीत, जप्त रकमेवर 137% पर्यंत कर आणि दंड आकारला जाऊ शकतो.
सोन्यावर कर: खरेदी आणि विक्रीचे नियम
वस्तू आणि सेवा कर (GST): सोन्याच्या खरेदीवर 3% जीएसटी लागतो. हा कर खरेदी किंमतीत समाविष्ट असतो.
– निर्माण शुल्क: सोन्याच्या दागिन्यांवरील मेकिंग चार्जवर 5% जीएसटी लागतो.
– भांडवली नफा कर:
– अल्पकालीन भांडवली नफा (STCG): 24 महिन्यांपेक्षा कमी काळ सोनं ठेवून विकल्यास नफ्यावर तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर लागतो.
– दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG): 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ सोनं ठेवून विकल्यास 12.5% कर लागतो. यापूर्वी उपलब्ध असलेला महागाई निर्देशांकाचा लाभ आता काढून टाकण्यात आला आहे.
– स्रोतावर कर संकलन (TCS): 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी केल्यास 1% TCS लागतो, जो तुम्ही आयकर रिटर्नद्वारे परत मिळवू शकता.
जर तुम्ही सोनं विकत असाल, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा
– तीन वर्षांपेक्षा कमी काळात विक्री केल्यास नफ्याला तुमच्या उत्पन्नात जोडलं जाईल आणि त्यानुसार कर लागेल.
– तीन वर्षांनंतर विक्री केल्यास 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागतो.
– सॉवरेन गोल्ड बाँड्सची परिपक्वता (मॅच्युरिटी) पर्यंत ठेवल्यास, नफ्यावर कोणताही कर लागत नाही.
कायदा आणि सावधगिरी
– कागदपत्रे जपून ठेवा: सोन्याची खरेदी पावती, वारसाहक्काची कागदपत्रे किंवा उत्पन्नाचा पुरावा नेहमी सांभाळून ठेवा.
– बँक लॉकरचा वापर: सुरक्षिततेसाठी सोनं बँक लॉकरमध्ये ठेवा.
– रोख व्यवहार कमी करा: मोठ्या रकमेचे व्यवहार बँकिंग प्रणालीद्वारे करा, जेणेकरून स्रोताचा पुरावा मिळेल.
– कर सल्लागाराची मदत: सोनं किंवा रोख रकमेच्या व्यवहारांसाठी कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

