(दापोली)
केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता परीक्षा रविवारी सर्वत्र पार पडली, या परीक्षेत दापोली तालुक्यातून तब्बल १०३७ असाक्षरांनी परीक्षा दिली. गत सालापासून महाराष्ट्र राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम जोरात राबविला जात असून, रविवारी झालेल्या परीक्षेत ३२३ पुरुष तर ७१४ असे १०३७ असाक्षरांनी साक्षरतेसाठी हजेरी लावली. यामध्ये दोन दिव्यांग असाक्षरांचाही समावेश होता.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सर्वेक्षकांमार्फत सर्वेक्षण करून, स्वयंसेवकांमार्फत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असाक्षरांना अध्ययनासाठी प्रेरीत केलले जात होते. स्वयंसेवकांनी ज्ञानदानाचे दिलेले धडे गिरवत आज प्रत्यक्ष परीक्षेस १०३७ असाक्षर सामोरे गेले. साक्षर जनता, भूषण भारत या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र लवकरच १००% साक्षर होईल आणि भारतासाठी भूषण ठरेल.