(दापोली)
तालुक्यातील पणदेरी बौद्धवाडी येथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएक ते साडेदीडच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव नितीन शंकर कांबळे (वय ३९, रा. पणदेरी, बौद्धवाडी) असे आहे. गेल्या काही काळापासून ते मानसिक आजाराने त्रस्त होते. नैराश्याच्या भरात त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या बेडरूममध्ये लाकडी वाशाला नायलॉनच्या पिवळ्या दोरीने गळफास घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेव्हाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती दाभोळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

