(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील ओमकार क्रिकेट क्लबच्या वतीने दिनांक 10 मार्च ते दिनांक 13 मार्च या कालावधीत भंडारपुळे प्रीमियर लीग मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भंडारपुळे येथील गावमळा मंदिराच्या मागे असलेल्या मैदानावर रंगणार आहे. सदर स्पर्धा वरवडे ते आरे या गावांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेत संघमालकांद्वारे लिलाव पद्धतीने खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला रोख 15 हजार रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख रुपये दहा हजार व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांक प्राप्त संघाला रोख रुपये 5000 व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
पहिल्या पर्वातील भंडारपुळे प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भंडारपुळे येथील ओमकार क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी भंडारपुळे येथील ओमकार क्रिकेट क्लबचे प्रमुख संयोजक निखिल भोळे, वीरेंद्र सुर्वे, प्रसाद पेडणेकर, सुयोग पाटील व पारस सुर्वे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.