(रत्नागिरी)
मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिरने घवघवीत यश संपादन केले असून ईश्वरी संदेश मावळणकर पाली केंद्रामध्ये प्रथम आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ती 32 वी, तर राज्यामध्ये 57 वी आली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकवर्ग यांनी ईश्वरीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नाणीज हायस्कूलची ही घवघवीत कामगिरी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाबद्दल ईश्वरी चा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचेही अभिनंदन करण्यात आले.