(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावात अंबुवाडी या ठिकाणी नवसाला पावणारा चव्हाटा देवस्थान आहे. दरवर्षी शेकडो लोक चव्हाट्याच्या राखणेला नवस लावण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात येतात. सहा वाड्यांची राखण व दशक्रोशीतील लोक मोठ्या भक्तीने राखणेला येतात. सर्व भक्तांना चव्हाटा पावतो. इच्छा पूर्ण करतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
नांदिवडे गावात माथ्यावर महाभयंकर संकट येत आहे. गॅस टर्मिनल सारखा धोकादायक प्रकल्प जिंदाल कंपनी या ठिकाणी लोकांना विचारात न घेता आणत आहे. हा प्रकल्प गावातून हद्दपार व्हावा म्हणून नांदिवडे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन नवसाला पावणाऱ्या देव चव्हाट्याला साकडं / गाऱ्हाणं घातलं. की गॅस टर्मिनल सारखं महाभयंकर संकट गावातून हद्दपार होउदे, गावाचे रक्षण कर. प्रकल्प गावातून स्थलांतर करण्याची बुद्धी अधिकारी व प्रशासनाला दे, असे गाऱ्हाणे यावेळी ग्रामस्थानी घातले.