(दापोली / सुदेश तांबे)
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, नगरसेवक आजींम चिपळुणकर, आणि किंगमेकर दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद (पप्पू ) रेळेकर यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
टायगर मिशन यशस्वी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेले टायगर मिशन आता दापोलीतही सुरू झाले आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम, आणि नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शिवसेना आता अधिक मजबूत झाली आहे. शहरप्रमुख श्री.प्रसाद पप्पू रेळेकर यांची मेहनत व प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. आता नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग आणि उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांच्या नावाची चर्चा आहे.