(देवरूख / प्रतिनिधी)
देवरूख शहरातील माणिक चौक येथील हॉटेल शांताराम चे मालक मनोहर लक्ष्मण तथा मामा दामुष्टे यांचे आज दुपारी 1वा. चे दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले.
मामा हे देवरुखची ग्रामदेवी सोळजाई मंदिराचे पदाधिकारी होते. मंदिराच्या जिर्णोद्धारात त्यांचे मोठे योगदान होते.
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन चे उपाध्यक्ष संतोष उर्फ बाबा दामूष्टे यांचे वडील होत.
त्यांचे पश्चात पत्नी मुलगा बाबा व मुली असा परीवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने देवरूखात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत:यात्रा उदया सकाळी ८.०० वाजता देवरुख माणिक चौकातील येथील राहत्या घरातून निघणार आहे.