(संगमेश्वर / एजाज पटेल)
दुचाकी समोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य एक महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली.
जंगल भाग सोडून गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांत मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची खाद्य शोदार्थ रात्रंदिवस भटकंती सुरु असून. काहींना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाल्याचेही बोलले जात आहे. तर भर मानवीवस्ती तसेच शहरीभाग व वाहन वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या मुक्या जनवारांची सावज साधण्यासाठी भटकंती करत असल्याचे तसेच सौरव रसाळ यांच्या घराजवळ येऊन भटक्या कुत्र्यांची पिल्ले पळवून नेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले होते.
एकंदरीत येथील वातावरणात बिबट्या ची दहशत एवढी गडद झाली आहे की, कोपऱ्या-कोपऱ्यात, नाक्या-नाक्यात चर्चा ऐकायला मिळतेय ती फक्त आणि फक्त बिबट्याचीच. तसेच पहाटे मोर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाल्याने तेही बाहेर पडेनासे झाले आहेत. तसेच नेहमी उशिरापर्यंत गजबजणारे संगमेश्वर बाजारपेठ आता बिबट्याच्या भीतीने लवकरच सामसूम होत आहे.
बिबट्या अशी दहशत असताना आज सकाळी चक्क शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी या नेहमीच वर्दळ व गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच बिबट्या वाघाने आंबेड खुर्द येथील मंदार मोहन राहटे (वय वर्ष 26 ) व त्याच्याबरोबर दुचाकी वरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण (वय वर्ष 26 गाव कोळंबे ) हे रेल्वे स्टेशन येथे जात असताना आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीला धडक देत तेथून पुन्हा जंगलच्या दिशेने पळ काढला.
अचानक चालत्या दुचाकी समोर बिबट्या आल्याने या दोघांची बोबडीच वळली. आता आपले काय खरे नाही असेच त्यांना वाटले. परंतु वाघाने तेथून पळ काढल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र बिबट्या च्या धडकेने दुचाकी रस्त्यावरून काही अंतर घासपट गेल्याने मंदार रहाटे व प्राजक्ता चव्हाण हे दोघेही जखमी झाले असून या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दिवसेंदीवस बिबट्याची दहशत अधिक गडद होत असल्याने या बिबट्या चा त्वरीत बंदोबस्त करण्याची तसदी वनविभागाने करण्याची मागणी केली जात आहे.