(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्याच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे दिनांक 6 व 7 जानेवारी 2024 रोजी झाल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये आगरनरळ कुणबी वाडी नं. 2 शाळेच्या सान्वी विष्णू गोताड ही वैयक्तिक धावणे मोठा गट मुली मध्ये दुसऱ्या नंबर ने यशस्वी झाली. तिची धावणे स्पर्धेसाठी जिल्हास्तरासाठी निवड झाली. लंगडी तालुकास्तरीय उपवेजेता ठरलेल्या संघात शाळेची विद्यार्थिनी श्रावणी रविंद्र गोताड हिने चमकदार कामगिरी केली.
मोठा गट मुली कबड्डी मध्ये चांदणी चंद्रकांत गोताड, सान्वी विष्णू गोताड आणि श्रुती शांताराम ठोंबरे यांनी तालुक्यामध्ये आपला खेळ दाखवून तालुक्यात कबड्डी मध्ये विजेती ठरली. त्यामधील चांदणी चंद्रकांत गोताड हिची रत्नागिरी तालुक्याची कर्णधार म्हणून जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली. आणि उत्कृष्ट पकड म्हणून सान्वी विष्णू गोताड हिची जिल्हास्तरावर डेरवण चिपळूण येथे खेळण्यासाठी निवड झाली आहे.या सर्वाना शाळेचे मुख्याध्यापक साळवीसर, पदवीधर शिक्षक गावडेसर, विचारेसर व वाघमोडेबाई यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत सरपंच मा. खेडेकर मॅडम,मा. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते खेडेकर, शाळेतील शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ वाडीतील सर्व ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.