(चिपळूण / मिलिंद देसाई)
न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या 1988 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे सातवे स्नेहसंमेलन नुकतेच अपरांत रिसॉर्ट, देवरुख येथे संपन्न झाले. या संमेलनाची सुरूवात गणेश गोडबोले यांनी गणेश पूजनाने केली, त्यानंतर दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करताना देवरुख शहरातील स्मशानभूमीत गेले तीन वर्षे आपल्या कुटुंबियांसमवेत स्वच्छता अभियान राबवणारे आणि ‘स्म’ मित्र संकल्पना राबवणारे श्री. संदीप पवार यांची मुलाखत छाया देसाई यांनी घेतली.
दुपारी ह.भ. प. मकरंद बुवा मोरे आणि देवयानी खवळे यांचे भजन, संध्याकाळी फनी गेम्स, स्लो सायकलिंग तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॅम्प फायर असे कार्यक्रम पहिल्या दिवशी संपन्न झाले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक मुळ्ये याने केले. शिल्पा भिडे, ,राजू जागूष्टे, वैशाली वेल्हाळ, संगीता हर्डीकर, संतोष पेडणेकर, नंदू साने, वैशाली वेल्हाळ आणि इतर कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी श्री. सोमेश्वर मंदिर, सांगवे आणि श्री. सांब मंदीर, पाटगाव येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंजचालन संदीप पवार यांनी केले. या संमेलनासाठी चाळीस सदस्य उपस्थित होते. पुढील वर्षी परत एकत्र भेटण्याचे अभिवचन देऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला

