(नवी दिल्ली)
केरळच्या पलक्कड येथे राहणारी नर्स निमिषा प्रिया येमेन येथे तुरुंगात फाशीची शिक्षा भोगत आहे. 2017 मध्ये निमिषावर तलाल अब्दो मेहदी या येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात पोहचले, जिथे निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर 2023 मध्ये तिला येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनडूनही दिलासा मिळाला नाही.
कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर निमिषा प्रियाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर २०२३ मध्ये येमेनमधील सर्वोच्च न्यायिक परिषदेकडेही याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर येमेनचे राष्ट्रपती राशद मोहम्मद अल अमीनी यांनी निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला मंजूरी दिली. येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद मुहमद अल-अलिमी यांनीही तिच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी निमिषासमोर ‘ब्लड मनी’ हा एकमेव पर्याय निमिषासमोर आहे.
अशा परिस्थितीत निमिषाचा जीव वाचवण्याचा आता एकमेव पर्याय ‘ब्लड मनी’ हा आहे. येमेनमध्ये ब्लड मनी पद्धत आहे. म्हणजे हत्या प्रकरणातील व्यक्तीला झालेली शिक्षा झाली माफ होऊ शकते. ब्लड मनी ही एक प्रथा आहे, ज्यात एखाद्या व्यक्तीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई म्हणून मोठी रक्कम दिली, तर त्याला माफ केले जाऊ शकते. ही रक्कम मृताच्या कुटुंबीयांशी करारानुसार ठरवली जाते. तलाल अब्दो मेहदी याच्या कुटुंबाने २०२२ मध्ये ब्लड मनी म्हणून ५ करोड येमेनी रियाल इतकी रक्कम नुकसान भरपाई मागितली होती. निमिषा प्रियाच्या वकिलांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०,००० अमेरिकी डॉलर (३८ लाख रुपये) दोन हफ्त्यामध्ये तलालच्या कुटुंबीयांना दिले आहेत. 3.5 कोटी रुपये भरणे बाकी आहे. या कामासाठी 2020 मध्ये ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन’ कौन्सिलची स्थापना करण्यात आली. निमिषा प्रिया २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात असून, तिला वाचवण्यासाठी तिचे कटुंबीय धडपड करत आहेत.
निमिषा प्रिया येमेनला जाण्यापूर्वी केरळमध्ये राहत होती. तिचा टॉमी थॉमस यांच्यासोबत विवाह झाला होता. निमिषा येमेनला गेली. तिथे राजधानी सना येथील सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. 2008 मध्ये जेव्हा निमिषा 19 वर्षांची होती, तेव्हा येमेनला गेली होती. त्यानंतर तिने स्वतःचे रुग्णालय सुरू करण्याचे ठरवले. पण, परदेशी नागरिक येमेनमध्ये रुग्णालय सुरू करू शकत नाही. त्यामुळे तिथे तलाल अब्दो मेहदी यांच्यासोबत ओळख झाली. त्यासोबत भागीदारी करत तिने रुग्णालय सुरू केले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर तलाल अब्दो मेहदी हा निमिषा प्रियासोबत छेडछाड करू लागला. 2016 मध्ये एक दिवस निमिषा कॅशिअरकडे हिशोब मागायला गेली, तेव्हा त्याने सांगितले की, तुमचा पती (तलाल अब्दो मेहदी) सगळे पैसे घेऊन गेला आहे. त्यानंतर समोर आले की, तलाल अब्दो मेहदी हा सगळ्यांना निमिषा माझी पत्नी असल्याचे सांगत आहे. त्याने बनावट कागदपत्रेही तयार केली होती. त्या कागदपत्रांवर लिहिलेले होते की, निमिषा त्याची पत्नी आहे. ही सगळी माहिती निमिषाला कळली.
2017 मध्ये निमिषाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. तलालने निमिषाचे आयुष्य नरक बनवले होते. त्याने तिच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली आणि पत्नी असल्याचे भासवून तिचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण केले. तलाल निमिषाच्या घरी ड्रग्जही घ्यायचा. एक दिवस तो निमिषाच्या घरी ड्रग्ज घेत होता. त्यावेळी निमिषाने त्याला नशेचं इंजेक्शन दिले. मात्र अतिसेवनामुळे तो ओव्हरडोज झाला आणि तलाल जमिनीवर पडला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.