(पाचल / वार्ताहर)
राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि शिवसेना राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचल ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, विभाग प्रमुख अमर जाधव, ग्रामविकास अधिकारी के वाय. कांबळे, दत्ताराम गोरुले यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरात डोळ्यांची सर्वकश तपासणी,काचबिंदूची तपासणी, ऑटो रिफ्रेक्शन टेस्ट, मोतीबिंदू तपासणी, आधीचा नंबर चष्मा असल्यास तो नंबर अचूक आहे की नाही हे तपासणे अश्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचा पाचल पंचक्रोशीतील जवळपास सव्वाशे लोकांनी लाभ घेतला असल्याचे शिवसेना विभाग प्रमुख शैलेश साळवी यांच्याकडून सांगण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, उपविभाग प्रमुख उदय राणे, कार्यकर्ते अमित साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.