( संगमेश्वर / प्रतिनिधी )
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वर येथील श्री देव कालभैरव-जोगेश्वरी (भैरिभवानी) मंदिरात यावर्षी बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात श्री कालभैरव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रमांची सुरुवात अभिषेक व ‘श्री’ ची पूजा, आरत्या आणि सायं. ७.३० वा. “स्वरसंघ कलामंच, कसबा” यांचे भजन गायनाने होणार आहे.मुख्य सोहळा बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडणार असून सकाळी ९.०० वा. ‘श्री’ चा अभिषेक व महापूजा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद सेवा, सायं. ६.०० वा. “जयशंकर” अभंग व नाट्यसंगीत मैफिल तसेच रात्री ८.३० वा. आरती, स्थानिक भजन आणि रात्री ११.०० वा. भजन-जागर असा विविध कार्यक्रमांचा भव्य मेळा भरविण्यात येणार आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कालभैरव-जोगेश्वरी (भैरिभवानी) मंदिर कार्यकारी मंडळाने केले आहे.

