(कळझोंडी / किशोर पवार)
बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्या विद्यमाने मनुस्मृति दहन दिन तथा मानव मुक्ती दिन समितीचे सभापती आयु. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तर उपसभापती विनोदजी मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाड क्रांतिभूमी येथे साजरा करण्यात आला .
याप्रसंगी माजी कार्याध्यक्ष व पतपेढी चे अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त किशोर मोरे, भन्ते महेंद्र थेरोजी, त्याचबरोबर मुंबई कौन्सिलचे पदाधिकारी महाड बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी, रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, तमाम बौद्ध धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी महाड क्रांतिभूमी येथील पुतळ्याला सभापती आयु. आनंदराज आंबेडकर, सौ. मनीषाताई आंबेडकर, कार्याध्यक्ष. लक्ष्मणराव भगत, औरंगाबाद येथील सत्यभामा मॅडम, मर्चंडे मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. भन्ते महेंद्र थेरोजी यांचे नेतृत्वाखाली धार्मिक पूजा पाठ घेण्यात आला. त्यानंतर जाहीर अभिवादन सभा घेण्यात आली.
या सभेत कर्नाटक येथील धम्म भगिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या जीवनावर कन्नडी भाषेत गीत गायन सादर केले. उपस्थितांनी या गीताला टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उत्स्फूर्त दात दिली. त्यानंतर झालेल्या 97 व्या मानव मुक्ती दिन क्रांती भूमी महाड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या 97 व्या मानव मुक्ती दिनाबाबत अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आणि मनुस्मृती दहन करण्याचे महत्त्व पटवून दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश घाडगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय आनंदराज आंबेडकर व मनीषाताई आंबेडकर यांचे रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी व महाड बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार ,उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सहसेक्रेटरी शशिकांत कांबळे, खजिनदार मंगेश सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार माननीय माननीय लक्ष्मण भगत यांनी मानले.