(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे सन 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन 2025 या नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी विविध ठिकाणाहून लाखो पर्यटक पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसर आणि गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे.
या निमित्ताने स्वयंभू गणपती मंदिरात ही दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होतानाचे चित्र दिसून येत आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात असलेली पार्किंगची व्यवस्था अपुरी पडू लागली असून थेट नजीकच्या मालगुंड येथील खारभूमी मैदानात पार्किंग व्यवस्था गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या तीर्थक्षेत्रात विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांबरोबर सध्या शालेय मुलांच्या सहलींचे प्रमाण अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
या तीर्थक्षेत्रात स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने दर्शनाची व्यवस्था अतिशय चोख करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांगांच्या ठिकाणी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गणपतीपुळे परिसर व मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था आणि ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ठीकठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले असून मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने रत्नागिरी पोलीस यंत्रणेमार्फत ज्यादा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांचे बरोब होमगार्ड व गणपतीपुळे ग्रामपंचायतचे सुरक्षा रक्षक अधिक मेहनत घेताना दिसून येत आहेत.
एकूणच गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्र सध्या भाभी को पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जात असून सन 2024 च्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन 2025 च्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गणपतीपुळे येथील स्थानिक व्यवसायिकांबरोबर पर्यटक व भाविक मोठ्या प्रमाणात आतुर झाले आहेत. एकूणच शनिवार व रविवार जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे 30 आणि 31 डिसेंबर रोजी थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने पर्यटक अधिक जोमाने या ठिकाणी येऊन आनंद लुटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या तीर्थक्षेत्रात थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर आणि नवीन वर्षाला स्वागत देण्यासाठी विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल झाल्यानंतर येथील समुद्रकिनारा असलेल्या उंट, घोडा सफर ए टीव्ही बाईक राईड आदींचा मनमुराद आनंद आणि समुद्रातील खास आकर्षण असलेल्या वॉटर स्पोर्ट च आनंद पर्यटक मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे चित्र दिसून येत आहेt. तसेच येथील मोठ्या गर्दीमुळे पर्यटन व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात उभारी आली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. या तीर्थक्षेत्रात असलेल्या स्थानिक व्यावसायिक बाजारपेठेबरोबरच या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या आणि उमेद च्या माध्यमातून विभागीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने त्या ठिकाणी असलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना व विविध प्रकारच्या वस्तूंना पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी या सरत्या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वस्तूंचा व व उत्पादनांच्या खरेदीचा आनंद लुटण्यात पर्यटक अधिक मग्न होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.