(दापोली)
जि.प.रत्नागिरी पुरस्कृत पंचायत समिती दापोली आयोजीत दापोली तालुकास्तरीय दोन दिवस चालणार्या क्रीडामहोत्सवाचे गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर, तालुकाध्यक्ष अविनाश लोखंडे तसेच नोडल अधिकारी रामचंद्र सांगडे, आदिं.च्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला. क्रीडास्पर्धेत उर्जा भरण्याचे काम तेरेवायंगणी आणि गव्हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.
प्रारंभी कुंभवे शाळेने संचलन, तर तेरे वायंगणी आणि गव्हे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत क्रीडास्पर्धेत उर्जा भरणेचे काम केले. उद्घाटक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे यांनी स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द असून खेळाने शरीरयष्टी घडते, स्पर्धकांनी खेळाचं उत्कृष्ठ प्रदर्शन दाखवावं असे आवाहन केले. तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या खेळाचा कल ओळखून त्याला जोपासणेसाठी शिक्षकांनी सहकार्य केल्यास क्रीडाक्षेत्रात दापोलीचाही नावलौकीक वाढू शकेल असे बळवंतराव यांनी सांगितले.
दिवसभर मुलगे सांघिक आणि मुली सांघिक लंगडी व वैयक्तिक क्रीडा प्रकार यशस्वीरित्या पार पडले. सुत्रसंचलन संजय मेहता यांनी केले.तर आभार प्रदर्शन विजय फंड यांनी केले. स्पर्धेसाठी बळीराजा शेतकरी संघ यांचेकडून सर्व स्पर्धकांना ट्राॅफी देण्यात आल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रिडा समितीतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.