(दापोली)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या वतीने दिनांक ८व९ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांसाठी अखिल टिचर प्रिमियम लिग पर्व -५ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, महिला दिनाचे औचित्य साधून माजी समाजकल्याण सभापती रत्नागिरी, श्रीमती,चारुता कामतेकर यांचे हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. प्रारंभी अखिल महिला शिक्षकांचा प्रेक्षणीय सामना खेळवण्यात आला. यावेळी बोलतांना कामतेकर यांनी गत पाच वर्षापासून शिक्षकांसाठी स्पर्धा भरवून तणावमुक्त करीत असून, महिलांसाठीही विविध स्पर्धा, उपक्रम आयोजीत करीत असलेबद्दल अखिल संघटनेचे कौतुक केले. तर घरोघरी नारीशक्तीचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केक कापून महिला दिनही साजरा केला.
पहिल्या दिवशी पुरुष शिक्षकांचे सहा सामने खेळवण्यात आले, तर रविवारी राजापूर ते मंडणगड पर्यंतचे सर्व संघ सहभागी होणार असल्याचे आयोजक तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी सांगितले, उद्घाटन सोहळ्यासाठी शिक्षक नेते रमाकांत शिगवण,जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर,सल्लागार संभाजी सावंत,महिला आघाडीच्या मुग्धा सरदेसाई, कार्याध्यक्षा मानसी सावंत,विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे, सर्व संघटनांचे पदाधिकारी,आदि उपस्थित होते. आझाद मैदान, दापोली, ता. दापोली येथे होत असलेल्या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी, शाखा दापोली, संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी आवाहन केले आहे.