(दापोली)
दापोली तालुका महत्वाकांक्षी व्हिजन दापोली हा उपक्रम सन २०१८ पासून दापोली पंचायत समिती मार्फत सुरु असून, सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. चालू शै.वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन आणि कार्यवाहीसाठी दापोली येथे व्हिजनचे अध्यक्ष धनंजय शिरसाट यांचे अध्यक्षतेखाली सहविचासभा आणि सराव परीक्षेची पुर्वतयारी, प्रश्नपत्रिका निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. शिष्यवृत्ती कमिटी कार्यरत शिक्षकांकडून विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार करणेचे नियोजन करणेत आले. तसेच गतवर्षी VDS 4 मधील यशस्वी ५० विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले.
यावेळी मुख्यसमिती सदस्य सुनिल कारखेले, प्रवीण काटकर, संजय मेहता, वैजयंत देवघरकर, शशिकांत बैकर यांचेसह शिष्यवृत्ती कमेटीतील विषयनिहाय सर्व शिक्षक उपस्थित होते. शेवटी धनंजय शिरसाट यांनी शिक्षणविभाग आणि मुख्य समितीच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.