(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी कारवांचीवाडी येथील सम्यक संबुद्ध समाज मंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी सम्यक संबुद्ध समाज मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कारवांचीवाडी रत्नागिरी यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2024 हा भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित्त उपस्थित बंधू-भगिनींच्या वतीने संविधानची प्रास्ताविका सामुदायिक ग्रहण करून संविधान दिनाला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील प्रशासन अधिकारी संतोष गमरे तसेच सिने अभिनेता निलेश पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सिने अभिनेता निलेश पवार यांनी मतदार हा राजा कसा आहे हे उदाहरण देऊन समजावून सांगितले, राजाने नेहमी जागृत असले पाहिजे, संविधानाची प्रस्ताविका यातील प्रत्येक शब्द हे विश्लेषण करून पटवून दिले, हा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष बळीराम गवई व महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुष्का मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सभासद पुरुष, महिला वर्ग व तरुण मित्र मंडळ यांनी मेहनत घेतली.