(दापोली)
कुणबी सेवा संघ, दापोली पूज्य सामंत गुरुजी आणि सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृती मेळावा आयोजीत सेवाव्रती शिंदे गुरुजी “उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार” माजी केंद्रियमंत्री अनंत गिते यांचे अध्यक्षतेत, तर ह.प.प.ज्ञानेश्वर बंडगर, अध्यक्ष प्रा.प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गीते, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रमोद सावंत आदिंच्या उपस्थित दापोली तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा कर्दे शाळेतील प्राथमिक शिक्षक स्वप्नील परकाळे यांना रविवार दि.११ जाने.रोजी सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह दापोली येथे प्रदान करण्यात आला.
परकाळेंसह शिक्षक, कषी क्षेत्रातील मान्यवर प्रगतशील शेतकरी अशा सहा,विभूतींचा गौरव करण्यात आला.
स्वप्नील परकाळे एक होतकरु,विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ख्यातनाम आहेत. पुस्तकी शिक्षणासह, भिंतीबाहेरची शाळा, स्वसंरक्षणाचे लाठीकाठीचे धडे, क्रीडास्पर्धा, शिष्यवृत्ती, नवोदयमधून त्यांच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळत आहे. सदर पुरस्कार सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि आईबाबा, पत्नी, मामा-मामी तसेच मित्रमंडळींच्या सहकार्यांने मिळाल्याचे परकाळे यांनी सांगितले. ए.पी.जे अब्दूल कलामांच्या कामाची पद्धत आपली उर्जा असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
नुकत्यात संपन्न झालेल्या शिक्षक, कर्मचारी व अधिकारी क्रीडास्पर्धेतही परकाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता, तर अनेक वर्षे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्येही विविध प्रतिकृतीमधून जिल्हास्तरीय प्राविण्य मिळवले आहे. सेवाव्रती शिंदे गुरुजी पुरस्कार मिळाल्याबद्दल परकाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

