(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गणपतीपुळे येथील सर्वच लहान मोठे स्थानिक पर्यटन व्यवसायिक, एमटीडीसी व देवस्थान समितीने विविध सेवा सुविधांची तयारी केली असून पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शाळा व महाविद्यालयांना दिवाळी सणाची सुट्टी जाहीर झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांसह अनेक पर्यटकांची पावले आता गणपतीपुळे पर्यटन स्थळासह अन्य पर्यटन स्थळांकडे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वळू लागले आहेत.
सध्या शनिवारपासून पर्यटकांची रिघ गणपतीपुळे कडे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची गणपतीपुळेला विशेष पसंती मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन निवास महामंडळाच्या एमटीडीसी मध्ये सध्या दहा तारखेपर्यंत पर्यटकांचे आरक्षण बुकिंग झाल्याची माहिती गणपतीपुळे पर्यटन निवासाचे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी गणपतीपुळे एमटीडीसीलाही पसंती दर्शवली असून आमच्या पर्यटक निवासामध्ये दिनांक 26 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत विविध ठिकाणच्या पर्यटकांनी आपली बुकिंग केली असून आमचे पर्यटन निवास फुल आहे. तसेच आमच्या पर्यटन निवासातील एकूण 80 एसी व नॉन एसी खोल्या पूर्णपणे दहा नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणेआरक्षित झाल्या आहेत. तसेच आम्ही पर्यटकांना चांगली सेवा सुविधा देण्यासाठी तशाप्रकारे तयारी केली आहे असे ते म्हणाले.
त्याचबरोबर गणपतीपुळे परिसरातील सर्व खाजगी हॉटेल लॉजिंग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून या सर्वांनी जय्यत तयारी केली आहे . त्यामध्ये प्रत्येक पर्यटक व्यावसायिकांनी आपापली हॉटेल्स व लॉजिंग चांगल्या प्रकारे रंगरंगोटी करून पर्यटकांना आकर्षित केली आहेत. तसेच तसेच येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यवसायिक सज्ज झाले आहेत. एकूणच गणपतीपुळे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असलेल्या सेवा सुविधा देण्यासाठी सर्वच लहान मोठे स्थानिक पर्यटन व्यवसायिक सज्ज झाले आहेत.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना खास आकर्षित करण्यासाठी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्ट संस्थेच्या माध्यमातून वॉटर स्पोर्टच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बनाना राईट, ड्रॅगन राईट, जेसकी बोट डिस्को राईट आदी वॉटर स्पोर्टचे प्रकार पर्यटकांना खास आकर्षित करत आहेत या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटकांना विशेष घेता येणार नाही तसेच गणपतीपुळे किनाऱ्यावर असलेल्या फोटोग्राफी, ए टीव्ही बाईक, उंट घोडा सफर आदी प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. एकूणच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी देवस्थान प्रशासन सुलभ सेवा सुविधा देण्यासाठी भाविक व पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या निमित्ताने गर्दीची गर्दीची स्थिती लक्षात घेऊन देवस्थान प्रशासनाने भाविक व पर्यटकांच्या दर्शनाची व्यवस्था सुलभ व्हावी याकरिता दर्शन रांगांची व्यवस्था चोख केली आहे. एकूणच गणपतीपुळे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ सज्ज झाले आहे.