(रत्नागिरी)
वाटद (खंडाळा) येथे झालेल्या जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित सब ज्युनियर जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यामध्ये ८ मुलगे आणि ६ मुलींचा समावेश आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या गटात —
कु. नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, अक्षरा विनोद झर्वे, अन्वया निलेश पावरी, सई देवचंद्र पावरी आणि श्रुतिका सुरेश निवेंडकर या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
तर मुलांच्या गटात — कु. रुद्र महेंद्र जाधव, श्रवण मनोज जाधव, पूजन रमेश धातकर, वेदांत सहदेव धातकर, आरव अविनाश जाधव, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, शुभम विनोद जाधव आणि प्रेम मोहन पवार या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गटात स्थान मिळवले आहे.
प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेने क्रीडा क्षेत्रातील आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा दि. २६, २७ आणि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेतून निवडक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम साहेब, पदाधिकारी आणि सदस्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

