(रत्नागिरी)
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, भाजपा आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे, गुरुप्रसाद फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल साळवी स्टॉप रत्नागिरी येथे शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास कोणत्याही वयोगटातील व्यक्ती लाभ घेऊ शकते असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. ५,६,७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निलेश आखाडे यांच्या वतीने मोफत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी देखील या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आखाडे यांनी केली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे अशांनी ९८६०६२५७४०, ७३८५५३०५२१, ( 79720 61996 whatsaap) या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक श्रद्धा कळंबटे, गुरुप्रसाद फाटक, निलेश आखाडे यांनी केले आहे.