(संगमेश्वर)
पत्नीच्या निधनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या वृद्धाने नैराश्यातून संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीत उडी मारून आत्महत्या केली. गोविंद सदू चांदिवडे (६४, रा. करजुवे- चांदिवडेवाडी, संगमेश्वर) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीला आला.
गोविंद चांदिवडे यांच्या पत्नीचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यांनी नैराश्यातून करजुवे खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. सोमवारी सायंकाळी ४:१५ वाजता करजुवे कावडी बंदर येथे त्यांचा मृतदेह दिसला. याबाबत संगमेश्वर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.