(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथे वास्तव्यास असलेले सुदर्शन श्रीधर शेट्ये (वय 52) हे गेले काही महिने बेपत्ता असून, त्यांचा अद्यापही काही ठावठिकाणा लागलेला नाही. दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी ते कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले आणि त्यानंतर परतलेले नाहीत. या संदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहून माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुधर्शन शेट्ये हे मतिमंद व्यक्ती असून त्यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील वाकेड आहे. सध्या ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल येथे, हॉटेल स्वाद समोर असलेल्या सुशांत विश्वनाथ कोळवणकर यांच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांना पूर्वीपासूनच अधूनमधून कोणालाही न सांगता घर सोडण्याची सवय होती. अशाचप्रकारे 17 सप्टेंबर 2024 रोजी ते घरातून निघून गेले, परंतु त्यानंतर ते परत आले नाहीत. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला, पोलीस यंत्रणाही सक्रिय असून त्यांचा कसून शोध सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस माहिती हाती आलेला नाही.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक 9/2024 नोंदवण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश कोलगे हे तपास करत असून, नागरिकांनी सदर व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नापत्ता सुधर्शन शेट्ये यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची पाच फूट सहा इंच, रंग निमगोरा, सडपातळ बांधा, पांढऱ्या रंगाचे केस व डोक्याच्या दोन्ही बाजूंना टक्कल, डोळ्यांचा रंग काळा आहे. ते निघून जाताना काळसर-नीलसर रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि फुलपँट परिधान केलेली होती. तसेच, त्यांच्या हातात आमदार उदय सामंत यांचे छायाचित्र असलेली छत्री होती.
सदर व्यक्ती कोणाला कुठेही दिसल्यास किंवा त्यांच्याविषयी काही माहिती असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा – संगमेश्वर पोलीस ठाणे किंवा तपास अधिकारी पो. हे.कॉ. सतीश कोलगे – मोबाईल क्रमांक 7499710050 किंवा 9766268194.