(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिरंदवणे व डिंगणी अशा वेगवेगळ्या दोन गांवामधून एक पुरुष आणि एक महिला अशा दोन व्यक्ती वेगवेगळ्या वेळी नापत्ता झाल्या असून त्यांचा तपास केला असता त्या आढळून आल्या नाहीत. तरी बेपत्ता दोन्ही व्यक्ती कोणाला दिसून आल्यास किंवा काही माहिती असल्यास संगमेश्वर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या डिंगणी पोलीस दूरक्षेत्रात येणाऱ्या पिरंदवणे येथून राजाराम महादेव कदम वय वर्ष 48 हे त्यांच्या राहत्या घरातून 20 जानेवारी 2025 रोजी निघून गेले आहेत. ते परत आले नसल्याची खबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदरील व्यक्तीचा वर्णन उंची 5फूट, चेहरा उभट, सडपातळ बांधा असा आहे.
तर डिंगणी बागवानी कोंड येथून भागीरथी विश्राम बाचिम वय वर्ष 76 ही वयोरुद्ध महिला तिच्या राहत्या घरातून 9 डिसेंबर 2022 रोजी निघून गेली असून तिचा शोध व तपास केला असता आढळून आलेली नाही. त्यांची उंची 5 फूट 4इंच, रंग सावळा, सडपातळ बाधा असा बांधा असून या वर्णनाच्या व्यक्ती बद्दल काही माहिती किंव्हा दिसून आल्यास संगमेश्वर पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे