(दापोली / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि जिल्हास्तरावर या निवडी करण्यात आल्या.
दापोली तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी अमोल मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात महासंघाचे संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी उजेर शेख यांची, तर कायदेविषयक सल्लागारपदी प्रमोद गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.
दापोली तालुका कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी गोरख वागसकर, सचिवपदी सुरज गायकर, कार्याध्यक्षपदी विकास पटले, कोषाध्यक्षपदी विनेश साळवी, प्रसिद्धी प्रमुखपदी नकुल कड आणि मुख्य संघटकपदी केशव नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न, प्रशासकीय अडचणी तसेच सेवाविषयक समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


