(जाकादेवी / वार्ताहर)
खंडाळा येथे डॉ. मयुरेश सुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’च्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला बाबू म्हाप, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, शिवसेना उपविभागप्रमुख अझीम चिकटे, अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, माजी सरपंच अमित वाडकर आणि अमोल बैकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मुळये, डॉ. जाधव, डॉ. विकी सावंत, डॉ. दीक्षा सावंत आणि पॅथॉलॉजिस्ट प्रसाद पेढे यांच्यासह मोहिते कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.
खंडाळा बसस्थानकासमोर, लाईफलाईन मेडिकलच्या शेजारी सुरू करण्यात आलेल्या या नवीन शाखेत सकाळच्या सत्रात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नवीन शाखेमुळे खंडाळा आणि परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा घेणे अधिक सोयीचे होणार आहे. डॉ. मयुरेश मोहिते यांनी सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


