(रत्नागिरी / वार्ताहर)
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने ५९व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले. मराठी कथालेखन स्पर्धेत महाविद्यालयाच्या प्रियांका नेर्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत गौरी ओळकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. नमिताताई कीर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भोवड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रियांका नेर्लेकर आणि गौरी ओळकर यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली असून, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला युवा महोत्सवासारख्या व्यासपीठावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे.


