(देवरुख / वार्ताहर)
देवरुख नगरपंचायतीच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त नगरपंचायतीच्या घंटागाडी क्रमांक दोनचे चालक व स्वच्छता कर्मचारी सागर उज्वल तळेकर यांचा उत्कृष्ट चालक व स्वच्छता कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
देवरुख शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून नियमितपणे सेवा बजावणाऱ्या सागर तळेकर यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शहरातील स्वच्छता व्यवस्थेत योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, नगराध्यक्ष मृणालजी शेटे आणि उपनगराध्यक्ष वैभवजी पवार यांच्या हस्ते सागर उज्वल तळेकर यांना उत्कृष्ट चालक व स्वच्छता कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या सत्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचेही महत्त्व अधोरेखित झाले.


