( देवळे / प्रकाश चाळके )
‘माझा शब्द हेच वचन’ आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या या स्लोगनचा प्रत्यय संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील ग्रामस्थांसह शिमगा उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांनाही याचा प्रत्यय आला. देवळे गावातील अनेक कामांचा निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्द अवघ्या काही दिवसात आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी पाळला असून एकूण पाच कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
पालखी उत्सवाचे औचित्य साधून आमदार भैय्या सामंत यांनी देवळे वासियांच्या कामांच्या मागण्यांचे भूमिपूजन आ.भैय्या सामंत यानी पत्रकार प्रकाश चाळके यांच्या हस्ते श्रीफळ देऊन केले. या कामांमध्ये देवळे मुख्य बाजारपेठ रस्ता डांबरीकरण करणे, देवळे रवळनाथ रस्ता डांबरीकरण करणे, देवळे एक पक्का बंधारा बांधने, देवळे (गोठण) येथे कप्प्याचा बंधारा बांधणे अशा कामांचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला.
गेली अनेक वर्ष या सर्व कामांची मागणी करूनही काम होत नसल्याने देवळे ग्रामस्थ हैरण झाले होते. या कामांसाठी प्रसाद अपंडकर ,रेश्मा परशेट्ये ,यानी मागणी केली होती. मात्र आमदार भैय्या सामंत यांनी दिलेले वचन पाळले असून देवळेवासियांनी आमदार भैया सामंत यांचे आभार मानले आहेत..निवडणूक होऊन काही महिन्यातच मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून आमदार भैय्या सामंत यांनी देवळेत दोन वेळा भेट दिली. त्यामुळे या पंचायत समिती गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे
या भूमिपूजन सोहळ्याला माझी शिक्षण सभापती विलास चाळके .ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे ,युवा तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर ,महिला उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री सुर्वे ,संजय सुर्वे, महिला तालुका संघटक रेश्मा परशेट्ये,युवा सेना उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख पंकज देवळेकर, उपविभाग प्रमुख अंकुश सुर्वे, बंड्या परशेट्ये, युवा सेना शाखाप्रमुख समीर आंब्रे प्रमिल चव्हाण ,प्रबोध आठल्ये, तसेच देवळे चाफवली जंगलवाडी मेघी, दाभोळे ,करंजारी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
.