(रत्नागिरी / वार्ताहर)
पावस येथील प्रसिद्ध आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व भालचंद्र उर्फ भाई महादेव गोडबोले (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पावस परिसरात शोककळा पसरली असून, मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भाई गोडबोले हे पावस परिसरातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रमंडळी तसेच नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
भाई गोडबोले यांच्यावर पावस येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांच्या भाऊ-बहिणींसह गोडबोले परिवार, मित्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहून भाई गोडबोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भाई गोडबोले यांच्या निधनाने पावस परिसराने सर्वांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध असलेले परिचित व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


