( चिपळूण )
चिपळूण नं.१ बीटच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५–२०२६ या स्पर्धा बीट विस्तार अधिकारी आस्मा कौसर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीटमधील सर्व केंद्रप्रमुखांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्या.
या स्पर्धेत बीटमधील एकूण पाच केंद्रांतील विद्यार्थ्यांनी उत्तम कौशल्य, खेळाडूवृत्ती व उत्साहाचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.
गोवळकोट केंद्रातील चिपळूण उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींनी विशेष कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला. विद्यार्थिनी खंसा सरफराज सय्यद हिने मुलींच्या लहान गटात थाळीफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर मुनीरा महबूब शेख हिने मुलींच्या लहान गटातील ५० मीटर धावणे या प्रकारात प्रथम क्रमांक, तसेच उंच उडी प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशाबद्दल बीट विस्तार अधिकारी देसाई मॅडम, केंद्रप्रमुख अब्दुलरऊफ सुर्वे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय गराटे, मुख्याध्यापक शौकत कारविणकर, शिक्षक राहीन नेवरेकर, जमील शेख, अब्दुल समद पटेल तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांना आगामी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.

