(रायगड / वृत्तसंस्था)
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या सहलीतील आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी मुले पाण्यात गेली असताना त्यांना खोलीचा अंदच न आल्याने त्यातील आठ जण खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. 42 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असे 44 जण सहलीसाठी आले होते. हे विद्यार्थी आळंदीतील विनर अकॅडमीतील असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथून खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी फिरत असताना अचानक आठ जण खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पाण्यात बुडालेल्या आठही जणांना बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर सर्वांना तातडीने बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे. समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


