(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी आणि सारस्वत चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने नवउद्योजक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम शनिवार दि. ०१/०३/२०२५ रोजी स.१०.०० वा. सेमिनार हॉल येथे पार पड़ला. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक हे श्री. आशिष मोंडकर यांनी वस्तूच्या विक्रीसाठी ग्राहकाच्या मानसिकता ओळखणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
आशिष मोंडकर युनिटॉप अक्वाकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून कार्यरत आहेत. १९९८ पासून त्यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला आणि कंपनीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. टेक्सटाईल, डिटर्जंट आणि केमिकल इंडस्ट्रीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियात्मक उपकरणांच्या उत्पादनात त्यांचा विशेष अनुभव आहे.
२००३ मध्ये त्यांनी कंपनीचा विस्तार करून वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, रिव्हर्स ऑस्मोसिस आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा विकसित केल्या आहेत. ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत आंत्रप्रेन्योर्स (GCSE) च्या नवीन संचालकपदी अशिष मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. सिध्दार्थ सिनकर ग्लोबल चेम्बर ऑफ सारस्वत एंटरपीनर्स चे संस्थापक आहेत.या संस्थेचा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी शी सामंजस्य करार झाला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि विद्यार्थी नवउद्योजक क्लबचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स , बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि नव उद्योजक क्लबचे विद्यार्थी उपस्थित होते. सिध्दार्थ सिनकर सरांनी त्यांच्या आयुष्यातील बिझनेस विषयी आलेल्या अनुभवांचे किस्से सांगितले त्यानंतर त्यांनी आव्हान केले की आम्ही जेव्हा पुढच्या वेळी येऊ तेव्हा विद्यार्थी आपल्या Business idea सांगाव्या व त्यावर प्रश्न विचारले जातील अश्या प्रकारे नवउद्योजक मार्गदर्शन कार्यक्रम झाला तर नक्कीच उपयोगी संवाद होईल अशी आशा व्यक्त केली.
वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ.सीमा कदम, डॉ मिनल खांडके, प्रा. हरेश केळकर, प्रा.नीता खामकर यावेळी उपस्थित होत्या. तसेच नवउद्योजक विद्यार्थी क्लबचे समन्वयक श्री .डाॅ. आनंद आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
व्यवसाय करताना त्या बद्दलची सर्व माहिती व सर्व ज्ञान आपल्याकडे हवे असते, यासाठी अभ्यासू व्यक्ती यांच्या सहकार्यातून नक्की विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक जागरूकता निर्माण होईल अशी आशा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केली. यावेळी उद्योजक मनोज तेंडुलकर आणि आजगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून धन्यवाद मानण्यात आले.