(संगमेश्वर / संदेश जिमन)
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा-संगमेश्वर संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी पुष्कर दत्ताराम गिते याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
पुष्करने १९ वर्षांखालील ग्रीको-रोमन प्रकारातील ६७ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक मिळवत आपल्या शाळेसह संगमेश्वरचे नाव उज्ज्वल केले.
पुष्करच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, पालक तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील या कामगिरीमुळे पुष्करच्या पुढील क्रीडा कारकिर्दीकडे संगमेश्वर परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले गेले असून, त्याच्याकडून भविष्यातील स्पर्धांमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.


