(संगमेश्वर)
श्रीक्षेत्र मार्लेश्वर जवळच्या बोंड्ये गावचे प्रतिथयश व्यापारी सुधाकर अनंत प्रभावळकर यांचे गुरुवारी दुपारी दुःखद निधन झाले. ते 93 वर्षाचे होते.
त्यांनी सुरुवातीला मॅट्रिक पास झल्यानंतर काही कालावधीसाठी शिक्षक, तलाठी यासारख्या नोकऱ्या केल्या. मात्र व्यवसायाची आवड असल्याने त्यांनी किराणा मालाचा व्यापार करण्याचे ठरविले. त्यांच्या दैवयोगाने मुंबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती व पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त कै. पै यांच्या प्रेरणेतून व आशीर्वादाने त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी बोंड्ये येथे छोटे दुकान सुरु केले. आणि प्रचंड मेहनत व प्रामाणिकपणाच्या जोरावर धंद्यामध्ये अफाट यश प्राप्त केले.
व्यवसाय हा गावची समाजसेवा करण्याच्या उद्देशानेच त्यांनी केला. गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना या व्यवसायातून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला. गावच्या विकासाच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे बोंड्ये देवरूख परिसरमधील लोकांमध्ये त्यांना आदर व मानसन्मान होता. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.