(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कोळवणखडी गावातील तीन ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले. भाजपाचे तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे व मोहन घुमे यांनी याबाबत माहिती दिली.
राजापूर तालुक्यात भाजपकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून, विविध गावांमध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
कोळवणखडी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सरिता मोरे, संचिता बने आणि विकास मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह काशिनाथ मोरे, नामदेव मोरे, शशिकांत मोरे, रूपेश मोरे, मंगेश मोरे, रूतिका रूपेश मोरे, रमेश मोरे, रेश्मा मोरे, निता मोरे, वैशाली मोरे, घनश्याम मोरे, वैजयंती मोरे, गजानन मोरे, रविंद्र मोरे, रमेश बने, शैलेश मोरे, योगेश रहाटे, माजी सरपंच आशा मोरे, माजी उपसरपंच सुहास मोरे, अरुण मोरे, गणपत मोरे, सुनिता कदम, इंद्रायणी चव्हाण, मालती रहाटे, सुमती रहाटे, विठ्ठल रहाटे, प्रकाश मोरे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, तालुका सरचिटणीस समीर खानविलकर, ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, राजा नलावडे, भोला गांगण, अमर वारेसे आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पक्षात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


