(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख नगरपंचायत परिसरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये अखेर पथदिवे बसवण्यात आल्याने परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे. उद्योजक श्री. राजू रेवणे आणि युवासेना शहर प्रमुख अर्जुन रेवणे यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने वॉर्ड क्रमांक १० मधील नागरिकांना पथदिव्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. पथदिवे सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वॉर्ड क्रमांक १० मधील नागरिकांच्या दृष्टीने पथदिव्यांची सुविधा महत्त्वाची ठरत असून, या भागाच्या विकासासाठी श्री. राजू रेवणे आणि श्री. अर्जुन रेवणे सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्या भागातील विविध गरजा आणि विकासकामांकडे लक्ष देत त्यासाठी पाठपुरावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून वॉर्ड क्रमांक १० मध्ये पथदिवे बसवण्यात आले आहेत.
पथदिवे सुरू झाल्यामुळे परिसरातील रस्ते आणि आजूबाजूचा भाग रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाला आहे. या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वॉर्डमधील विकासकामाला आणखी एक सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. पथदिव्यांच्या सुविधेमुळे परिसर उजळल्याने नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये यांचे आभार मानण्यात आले. वॉर्ड क्रमांक १० मध्ये पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला असून, या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


