(संगमेश्वर / एजाज पटेल)
सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माभळे पंचायत समिती गणातून नावडी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या निर्णयावर ठाम असून, तसे संकेतच त्यांनी दिले असून आपणच निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य घराण्यातील तसेच समाजकार्यात धडपडणारा व्यक्ती पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार असल्याने परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माभळे पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने या गणातून निलेश कदम यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा मित्रमंडळी आणि परिसरातील लोकांनी केल्यामुळे निलेश कदम यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
निलेश कदम यांनी गेल्या पंचवीस वर्षात तालुक्यातील विविध सामाजिक आणि प्रशासकीय कार्याला साद दिली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान असून विविध स्वयंसेवी संस्थे मार्फत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबवले असून त्यांनी पारदर्शक सामाजिक कार्यामुळे तळागाळापासून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. अधिक जोमाने जनतेचे प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी लोकशाहीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल अशी चर्चा त्यांच्या सहकारी मित्रमंडळीसह माभले पंचायत समिती गणातील जनतेकडून केली जात आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता अपक्ष म्हणून पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठाम निर्णय घेतला असून, मित्रपरिवार आणि परिसरातील लोकांच्या आग्रहामुळेच मी हा निर्णय घेतला असून लोकांचा आग्रह आणि उत्साह पाहून मला नक्कीच विजयी यश प्राप्त होईल असा आत्मविश्वास असल्याचे निलेश कदम यांनी सांगितले आहे.
निलेश कदम यांच्या पाठीशी युवा वर्ग, अनेक नागरिक भक्कमपणे उभे असून आता पासूनच त्यांनी लोकांपर्यंत पोहचण्याचे काम सुरु केले आहे. निलेश कदम निवडणूक रिंगणात उतरल्यास माभळे पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुद्धा या निमित्ताने वर्तवली जात आहे.

