(गणपतीपुळे / वैभव पवार)
बालरंगभूमी परिषद आणि श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा, बसणी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
गणेशमूर्ती काम स्पर्धेत कु. आराध्य मंदार झगडे याने द्वितीय क्रमांक मिळवला. अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत गौरी सचिन नेवरेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत सृष्टी संतोष चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
याशिवाय दुर्वा सुमित राणे, सान्वी सचिन गाडे आणि आदित्य नेवरेकर यांनीही विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. या यशामुळे जिल्हा परिषद मराठी शाळा, बसणीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांनाही नवी ओळख मिळाली आहे.


