( रत्नागिरी /प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने रविवार दिनांक ८.१२.२०२४ रोजी सम्यक सभागृह संगमेश्वर येथे जिल्हाध्यक्ष आद. अनंत विठ्ठल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगला सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत जिल्हाध्यक्ष यांची राज्याच्या संस्कार विभाग सचिव पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा व तालुक्याच्या वतीने शाल व गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला.
या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये २०२४-२५ ची सभासद नोंदणी जास्तीत जास्त करून जानेवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करावी.धम्मयान मासिक वाचक नोंदणीची यादी पाठवून सहकार्य करावे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या धम्म परिषदेची माहिती आपल्या तालुक्यातील सर्व सभासद बंधू भगिनींना देऊन सहकार्य करावे, जिल्ह्याचे महिला विभागाची कार्यकारिणी निवडण्यासाठी आप-आपल्या तालुक्यातील महिला भगिनींची नावे कळवून सहकार्य करावे. यावेळी जिल्हा सरचिटणीस एन्.बी.कदम यांनी संपूर्ण मिटिंगच्या विषय पत्रिकेनुसार विषयांची योग्य मांडणी केली.
या बैठकीला एन्.बी.कदम, प्रदिप जाधव,विजय जाधव,अल्पेश सकपाळ,विजय कांबळे, सुनील पवार,ज.भा.कदम,डि.एन.मोरे. सत्यवान जाधव,आर.बी.कांबळे, संजीवन सावंत, प्रकाश कांबळे,विद्याधर कदम,रमण तांबे ,अनिल घाडगे, अशोक जाधव,अनंत जाधव, महेंद्र गमरे,जयेश मोहिते, प्रमोद गमरे, धर्मपाल पवार, दिनेश कांबळे आदी उपस्थित होते.