(गुहागर/ रत्नागिरी)
घरातील कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून ५८ वर्षीय व्यक्तीने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडी येथे घडली. २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिस नोंदीनुसार, बबन सिताराम आंबेकर (वय ५८, रा. शीर भाटले आंबेकरवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घरातील कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादानंतर हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद करण्यात आले आहे. घरातील हॉलमध्ये बबन आंबेकर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ३९/२०२६ म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेबाबत खबर योगेश बबन आंबेकर यांनी दिली असून, पुढील कार्यवाही व तपास सुरू आहे.


