(रत्नागिरी)
जनसंपर्क कार्यालय हे केवळ प्रशासकीय कामकाजाचे केंद्र नसून कार्यकर्त्यांसाठी विचारधारेचे संस्कारपीठ आणि जनसामान्यांच्या समस्या व अपेक्षांना वाचा फोडणारे हक्काचे व्यासपीठ असते. याच संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व सुसज्ज कार्यालयांची उभारणी करण्यात येत आहे.
रत्नागिरी दौऱ्यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा कार्यालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमाला प्रतिसाद देत नव्या कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार योगेशजी सागर, प्रदेश सचिव आमदार प्रशांतजी ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आमदार ॲड. निरंजनजी डावखरे, आमदार प्रमोदजी जठार, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभवजी खेडेकर, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, ओवैस चौगुले, संकेत कदम, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणासोबतच कार्यकर्त्यांना सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कार्यालयाची उभारणी महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

